उमरखेड, अरविंद ओझलवार। धुणे धुतल्यानंतर पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू तर एक अत्यवस्थ झाल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. ही दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर गावाजवळील पैनगंगा नदीपात्रात आज दि . 26 जून रोजी दुपारी १२ ३० वाजता चे दरम्यान घडली. या घटनेने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे .
अवंतिका राहुल पाटील वय 13 सावळेश्वर , कावेरी गौतम मुनेश्वर वय 15 रा बाभळी ता हदगाव , चैतन्य देवानंद काळबांडे वय 17 रा सावळेश्वर असे मृतकाचे नाव असुन शुभम सिद्धार्थ काळबांडे वय 22 रा सावळेश्वर हा अत्यवस्थ असल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे .
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पलीकडल्या काठावर सावळेश्वर गाव आहे, या गावाजवळील नदीपात्रात धुणे धुण्यासाठी अवंतिका पाटील व कावेरी मुनेश्वर ह्या दुपारी गेल्या होत्या. धूने धुतल्यानंतर पोहण्यासाठी त्या नदीपात्रात गेल्या पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या बुडू लागल्या. त्यावेळी नदीपात्राच्या काठावर उभे असलेल्या चैतन्य काळबांडे व शुभम काळबांडे यांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीत उड्या मारल्या .परंतु त्यांना सुद्धा पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी नदी पात्रावर उभे असलेल्या महिलांनी गावाकडे धाव घेत आरडाओरड केली.
त्यानंतर तिथे विवेक रावते , शेख अजीम यांच्यासह दहा ते पंधरा युवकांनी येऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये कावेरी मुनेश्वर ही जागेवरच मृत झाली होती तर अवंतिका व चैतन्य यांना ढाणकी येथे उपचारासाठी आणत असताना त्यांचा मृत्यू झाला .तर शुभम काळबांडे हा अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले .मृतकामधील कावेरी गौतम मुनेश्वर ही मामाच्या घरी पाहुणे म्हणून आली असताना तिचा दुर्दैवी अंत झाला . या घटनेने सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे .