श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील मौजे इवळेश्वर येथील तरुण साईलाल भैयालाल जयस्वाल वय ३३ वर्ष याने इवळेश्वर जवळील मौजे हिंगणी येथील जंगलात सागाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (The dead body of the youth) केल्याची घटना दि १८ रोजी दुपारी उघडकीस आली आहे.


हिंगणी येथील उपसरपंच विवेक माळेकर यांनी हिंगणी च्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मुत्युदेह असल्याची माहिती पोलीसांना दिली, घटनास्थळी पोलीसांनी पाहणी केली असता आधार कार्ड, मतदान कार्ड व इतर कागदपत्रामुळे मयताची ओळख पटली.


मयत साईलाल भैयालाल जयस्वाल यांचे भाऊ बालाजी भैयालाल जयस्वाल यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिल्याप्रमाणे तो एक महिण्यापासून रोजगारा निमित्त बाहेर गावी जातो म्हणून गेला असल्याचे सागितले.


घटनेची माहिती मिळताच सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोऊपनी पालसिंग ब्राह्मण, पोहेका गजानन चौधरी. यांचेसह होमगार्डनी घटनास्थळी जाऊन लटकलेल्या मुत्यदेहाचा पंचनामा केला. वानोळा येथील डॉ, टारपे यांना प्राचारन केले. त्यांनी जायमोक्यावरच मयत भैयालालचे शवविच्छेदन केले सदरील मुत्यूदेह १० ते १२ दिवसाआधी गळफास घेतलेले असावे असा अंदाज व्यक्त केला.



