नवीन नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना बिल.एल.ओ.मार्फत पोलचिटचे वाटप सिडको हडको परिसरात 10 नोव्हेंबर पासून सुरूवात करण्यात आल्यामुळे अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या आदेशानुसार सिडको हडको परिसरातील पर्यवेक्षक एस.एम.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिल.ए.ओ. मारोती बतलवाड, बालाजी पाटोळे,शिवकन्या कुंभार गावे, रविंद्र पवळे, मांजरमकर शिला गंगाराम, चंद्रकांत माधवराव सांगळे, गिराम प्रभु, सावित्रा तुकाराम कोतापलु.
मामीलवाड यस.एल, भदरगे संतोष ,महमंद फारूक अन्सारी अब्दुल हमीद, ओंकार पांडुरंग पांचाळ ,राजकिरण देवणे,राजेश्वरी राजेश्वर करडखेले,सुरेवाड परबता, कुलकर्णी नृसिंह किशनराव,गिरी पांडुरंग गोविंद,धोंगडे एस.जे,माने के.जी, गिरी पांडुरंग गोविंद, पंढरीनाथ पोटफोडे,शंकुतला पि.चाडेवार, शिवराज रामराव हाते, धाराजी यशवंत सावते ,एस.एन.गजले याच्या सह परिसरातील मतदान केंद्रावर कार्यरत बिएलओ यांनी 10 नोव्हेंबर पासून सिडको हडको,कौठा, वसरणी ,असदवन ,असरजन,जुना कौठा ,नवीन कौठा भागात पोलचिट वाटपास सुरूवात केली आहे.
प्रशासनाने सर्व प्रथम पोलचिट वाटपास सुरूवात केल्यामुळे अनेक मतदारांनी आपले नाव मतदान यादीत असल्याचे व पोलचिट मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.