नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील दोन चोरीच्या घटनेतील आरोपी पोलीसांनी पकडले असून, त्यांच्याकडून 1 लक्ष चार हजार सहाशे रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील जनता काॅलनी भागामध्ये एका किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे साहित्य व नगदी रक्कम असा एकूण 36 हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्येमाल घेऊन पोबारा केला होता. हि घटना गेल्या आठवडाभरापूर्वी घडली होती. आणी या अगोदर हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. तसेच दरम्याच्या काळात आणखी एव घरफोडी करून दुसऱ्या घरफोडीत 81 हजार पाचशे रुपयाचा मुद्येमाल चोरल्याचे पकडण्यात आलेल्या आरोपीने सांगीतले आहे.
दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान करून एका २२ वर्ष व एक विधी संघर्ष बालक या दोन आरोपींना हिमायतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी दोन घरफोडीत एकुण 1 लक्ष सतरा हजार नऊशे रुपयाचा मुद्येमाल चोरल्याचे सांगीतले. त्यापैकी 1 लक्ष चार हजार सहाशे रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला असुन, गुन्हयात एक एम्पलीफायर आणि माईक असे 13 हजार तीनशे रुपयाचा मुद्येमाल तिथेच सोडुन दिल्याचे सांगीतले आहे.
हिमायतनगर शहरातील चोरी प्रकरणी आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली असून, यातील विधीसंघर्ष बालकास त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोमल कांगणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सुंदर नागरगोजे, पोलीस नाईक पवन चौदंते यांनी पोलीस ठाणे हिमायतनगर हद्दीत घडलेल्या गुन्ह्य़ातील गेलेला माल व नगदी रक्कम हस्तगत करण्याची कारवाई केली आहे.