नांदेड | उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. सिधेश्वर पाटील शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.


कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. रविंद्र सोनकांबळे यांच्यासह गिरीश शाहिर सर, कार्यालयीन लिपीक शेख शफी, किरनकुमार सर्जे, आश्विनी दाढे आणि रोहिनी कांबळे यांची उपस्थिती होती.

ध्वजारोहनानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समानता व सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित विचार मांडले. कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.



