हिमायतनगर,अनिल मादसवार| पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात दि.१९ ऑगस्ट रोजी येणाऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारी भव्य महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. रेखाताई चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी जास्तीस्त जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासावी असे आवाहन डॉ. रेखाताई चव्हाण यांनी केले आहे.
डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर प्रभारी महिला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्षा नांदेड यांच्यावतीने पवित्र श्रावण मासानिमित्ताने हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी असलेल्या जागृत देवस्थान महादेव मंदिरात अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवून श्रावण मास उत्सवाचा आनंद द्विगुणित केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर मंदिरात तिसरा सोमवारचा शुभमुहूर्त साधून सकाळी ११ ते दुपारी ०३ या वेळेत भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच याच दिवशी भव्य रक्तदान शिबीर देखील सकाळी ११ ते ०३ या वेळेत श्री परमेश्वर मंदिर संस्थान, हिमायतनगर (वाढोणा) येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दानात दान रक्तदान…. समाजात वाढेल मान… या उक्तीप्रमाणे शिबिरात सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन डॉ. रेखाताई चव्हाण केले आहे.
दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्ताने भव्य वादविवाद स्पर्धा संत रोहिदास सभागृह, हदगाव येथे दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी वेळ ११ वाजता होणार असून, या वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.रेखाताई पाटील यांनी केले आहे. या स्पर्धेत विजेते होणाऱ्यांना प्रथम पारितोषिक ११०००/- रुपये, द्वितीय पारितोषिक ७०००/- रुपये, तृतीय पारितोषिक ५०००/- रुपये व तसेच उत्तेजनार्थ – ११११/- रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे.