हिमायतनगर,अनिल मादसवार। छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक जमिनिदोस्त होण्यास कारणीभूत असलेल्या सबंधित सर्व अधिकारी, गुत्तेदार व इतर प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी करून सर्वांवर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर शहर व तालुक्यातील शिवप्रेमींनी एका निवेदनाद्वारे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह संबंधितांना निवेदन पाठवून केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरील पुतळा कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. संबंध विश्वाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी स्मारकाच्या संरक्षणाची जबाबदारी राज्या शासन, प्रशासकीय अधिकारी, गुत्तेदार यांची असतांना याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. सर्वांनी आपल्या जबाबदारीने पालन न करता अक्षम्य दुर्लक्ष करून निकृष्ठ दर्जाच्या कामास अनुमती देउन महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे योग्य रीतीने काळजीपूर्वक निर्माण केले नाही. त्यामुळे सदर स्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण नंतरच्या ८ महिन्यात जमीनदोस्त झाला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या त्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सर्व अधिकारी, गुत्तेदार व इतर प्रशासकीय अधिकारी यांची सखोल चौकशी करून भारतीय न्याय सहिते नुसार कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा शिवप्रेमीच्या वतीने तीव्र अदोलन छेडण्यात येईल त्याची सर्व जबाबदारी प्रशासन व शासन यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देखील निवेदनातुन देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रति महामहीम राष्ट्रपती महोदय भारत सरकार, महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मा. पंतप्रधान भारत सरकार, गृहमंत्री भारत सरकार, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील सर्व शिवप्रेमीच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर डॉ. प्रकाश वाभाडेचार तालुका, श्रीदत्त पवार सोनारीकर, पंडित ढोणे, धोंडोपंत बनसोडे, कल्याण पाटील, संतोष शिरगिरे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.