Saturday, May 16

Tag: Youth danced on the plantation of Jnantirtha-2024 Inter-College Youth Festival

Jnantirtha-2024 Inter-College Youth Festival – ज्ञानतीर्थ-२०२४ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवातील लावणीवर तरुणाई थिरकली – NNL

Jnantirtha-2024 Inter-College Youth Festival – ज्ञानतीर्थ-२०२४ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवातील लावणीवर तरुणाई थिरकली – NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात दुसर्‍या दिवशी मुख्यमंचावर सादर झालेल्या लावणीने तरुणाई थिरकली. युवक महोत्सवात लावणी या कलाप्रकाराला प्रेक्षकांचा मोठा प्रतीसाद मिळाला. स्पर्धक कलावंतांनी पारंपारिक पद्धतीने लावण्या सादर केल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या अदिती केंद्रे हिने ‘तुम्ही याव सजना, रंग होळीला’ ही शृंगारिक लावणी सादर केली. या लावणीला प्रेषकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची मोठी दाद मिळाली. ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी’ ही लावणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील ललित व कला संकुलाच्या कु. प्रतीक्षा बुंदराळे हिने सादर केली. या लावणीला प्रेक्षकांनी मोठी दाद मिळाली. नारायणराव चव्हाण विधी महाविद्या...
error: Content is protected !!