learning German ; जर्मन शिकण्यास व जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक युवकांनी नावनोंदणी करा – NNL
नांदेड| जर्मनीला नोकरी व रोजगारासाठी जाणाऱ्या कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकविण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गास जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळातील इच्छुक शिक्षकांनी तसेच जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या पात्र व कुशल युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये मोठया प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशामध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर राज्यातील युवकांना युरोपियन देशामध्ये नोकरी व रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेवून महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करुन उपलब्ध करुन ...
