Bhokar police took action : भोकर पोलिसांनी माफियाविरुध्द कारवाई करुन 2 लक्ष 45 हजार रुपयाचा गुटखा पकडला -NNL
नांदेड/भोकर| राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व गुटखा एकुण किंमत 45,000/- रुपयाचा 2) एक काळया रंगाचा अॅपे अॅटो ज्याचा पासिंग क्र. MH-26-AC-2001 असा असलेला जु.वा. कि.अं. 2,00,000/- रुपये असा एकुण 2,45,000/- रुपयाचा मुद्येमाल अवैद्यरित्या विक्री करण्यासाठी जाताना भोकर पोलिसांनी कार्यवाही करून मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे गुटखा माफ़ियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत पो.स्टे. हधीतील अवैध गुटखा विक्रो व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अजित कुंभार पोलीस निरीक्षक, भोकर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सोबतचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने परिणामकारक पेट्रोलिंग लावण्यात आली होती. पेट्रोलिंग दरम्यान दिनांक 20/12/2024 रोजी बसस्थानक भोकर...
