Why is it so sour when the safe is shaking? तिजोरीत खडखडात असतांना उगाच खटाटोप कशाला? -NNL
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड, यांच्या वतीने योजना माहिती केंद्र सर्व शासकीय कार्यालयात राबविण्यात येत आहेत, परंतु लोकांना माहित असलेल्या व कार्यान्वित असलेल्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही हे वास्तव परिस्थिती आहे.
याकडे शासन आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. संजय गांधी निराधार योजना, रमाई आवास योजना,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,श्रावणबाळ योजनासह विविध योजना आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत दोन दोन महिने उशीरा मिळतात, सोईनुसार विधवा, परितकत्या महिलांची नावे पात्र केली जातात किंबहुना पीडित महिलांचा अवमान केला जातो.
गरजू व बेघर व्यक्तींना रमाई आवास योजनेचा लाभ वेळेवर दिला जात नाही. त्यांना आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ येते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी विध्यार्थ्यांना त्यांच्या श...
