Wednesday, May 13

Tag: water filter machine stuck

water filter | दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत -NNL

water filter | दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत -NNL

नांदेड
सोनारी फाटा/हिमायत्तनगर,शेख खय्युम। तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायत मधील नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी या हेतूने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून व मागासवर्गीय अनुदान निधीतून असे दोन्ही पाणी फिल्टर मशीन मागील जळवपास तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आल्या होत्या त्या मशीनीची सद्याची स्थिती पाहता, धुळखात पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर बंद असल्याने नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्पदरात मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून लावलेल्या फिल्टर मशीन अडगळीत पडल्या आहेत. यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुळघात पडल्या आहेत. या पाणी फिल्टरवर लाखो रूपये खर्च केले गेले, मात्र साहित्य तकलादू असल्याने नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेली मोठी ग्राम...
error: Content is protected !!