the first day of school : शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात रंगला गुलाबपुष्प स्वागताचा उपक्रम
नांदेड| जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाच्या 100 शाळांना भेट उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी, शिक्षक व पालक यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तर नवागत पहिलीतील विद्यार्थ्यांना फुले, पुस्तके, पेन्सिल तसेच स्मरणघडी पत्रिका देऊन स्वागत करण्यात आले.
खासदार अशोक चव्हाण यांनी भोकर येथील नूतन कन्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी माहूर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेस भेट देवून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. आमदार तथा बाळासाहेब ठाकरे हळद-हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नांदेड तालुक्यातील पासदगाव शाळेला भेट दिली. आमदार प्रतापराव चि...
