Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे शोषण सत्तेच्या विरोधात होते -NNL
नांदेड| अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून प्रस्थापित धर्मसत्तेच्या विरोधात बंड पुकारले. आंबेडकरवाद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. समाजाची पुनर्रचना ही अण्णाभाऊंच्या साहित्याची अपेक्षा होती. राजसत्ता हाती घेतल्याशिवाय दलितांची प्रगती होणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले होते. ते समाजातील विविध प्रकारच्या शोषण सत्तांच्याही विरोधात होते, असे प्रतिपादन येथील आंबेडकरवादी विचारवंत बाबुराव कोकरे यांनी केले.
ते भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या (बीपीएसएस) वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. शहरातील शिवाजी नगरच्या हाॅटेल विसावा पॅलेस काॅन्फरन्स हाॅल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, बीपीएसएसचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप काठोडे, राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, सुप्रसिध्...
