Jyotiba kharate ; ज्योतीबा खराटे यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता -NNL
श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहेरे। शिवसेना पक्षाचे किनवट-माहुर विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या वर पंचायत समितीचे तात्कालीन गटविकास अधिकारी यु.डी.मांदाडे यांनी राजकीय दबावाला बळी पडून सन २०१७ मध्ये पोलिस स्टेशन माहुर येथे फिर्याद देऊन भा.द.वी कलम ३५३,२९४,५०६ अनव्ये गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातून ज्योतीबा खराटे यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
माहूर पंचायत समितीचे तात्कालीन गटविकास अधिकारी उद्धव मांदाडे यांनी शिवसेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विधानसभा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या विरोधात दि.१२ जुन २०१७ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल केला होता. सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल धावरे यांनी केला होता.
तपासणी अंती त्यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते, या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाल...
