Wednesday, May 13

Tag: warns for Nanded district

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा; रविवार व सोमवारी येलो अलर्ट जारी

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा; रविवार व सोमवारी येलो अलर्ट जारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 13 व 14 एप्रिल हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या गोष्टी करा विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी...
error: Content is protected !!