Nagarpradakshina around the city of Wadhona | पाऊले चालती पंढरीची वाट….. परंपरेनुसार टाळ – मृदंगाच्या गजरात वाढोणा शहराभोवती नगरप्रदक्षिणा – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| यंदाचा खरीप हंगाम भरभराटीचा होवो आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्ती मिळावी... अशी प्रार्थना करून आषाढी एकादशी दिनी शेकडो भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला - पुरुष भक्तांनी टाळ - मृदंग आणि विठू नामाच्या गजरात शहराला नगरप्रदक्षिणा घालून पंढरपूरच्या पाई वारीचा आनंद घेतला आहे.
श्रीक्षेत्र असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर व बोरगडी येथील विठ्ठल मंदिरात पंढरपूर यात्रा आणि आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण व कधीमध्ये पाऊस सुरु होतो आहे. अशातही दि.१७ जुलै रोजी आलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायीक महिला - पुरुष, भाविक भक्त, बालकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठल रुख्माई आणि श्री परम...
