‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ पत्रकार संघटनेचे शिर्डी येथे आज ३१ ऑगस्ट पासून दोन दिवस शिखर अधिवेशन -NNL
नांदेड। देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे आज ३१ ऑगस्ट व उद्या १ सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबांबाच्या नगरीत भरणार आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या, प्रश्नांवर चर्चा, ठराव होणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांत पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे, बौध्दिक व सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजनही करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील जवळपास १०० पत्रकार या अधिवेनात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचे सकाळी ११ वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोन्हे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित,...
