The funeral will be held shortly : वसंतराव चव्हाण यांच्यावर नायगावात मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार -NNL
नांदेड, अनिल मादसवार| नांदेडचे विद्यमान खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्टला पहाटे हैद्राबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड मतदार संघातून ते विजयी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थामुळे प्रथम नांदेड येथे व नंतर हैद्राबाद येथे उपचार घेत होते. मात्र 26 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांनी दुखवटा व्यक्त केला आहे. राज्य शासनाने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात घेण्याचे निर्देश नांदेड जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहेत...
