Two youths die of shock : हळदीच्या दिवशी लग्न मंडप टाकताना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू
हदगाव| तालुक्यातील मौजे बोरगाव येथे एका लग्न सोहळ्याचा मंडप टाकण्याचे काम सुरु असतांना विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना दिनांक १९ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली असून, गावात शोककळा पसरली आहे.
सर्वत्र लग्नसराची धामधूम सुरु आहे, त्यामुळे गावागावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशाच आनंदावर विरजण टाकणारे घटना हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव येथे घडली असून, मौजे बोरगाव येथे दि. २० एप्रिल रोजी दोन विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते. या लग्न सोहळ्याची गावात तयारी सुरू असल्याने दिनांक १९ रोजी रात्री गावातील तरुण मदतीसाठी आले होते. गावातील काही युवक हळदीच्या दिवशी मंडप टाकण्याचे काम करीत होते. दरम्यान अचानक वारे आल्याने मंडपाच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारेला मंडपाच्या खांबाचा अनावधानाने स्पर्श झाला.
यावेळी व...
