J. P. Nadda : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार व सुपर स्पेशालिटी सुविधांची मागणी
नांदेड| मराठवाड्याच्या आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या नांदेड सिव्हिल हॉस्पिटलच्या विस्तारी करणासाठी आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारकडे ठोस मागणी सादर केली आहे. देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. जे. पी. नड्डा यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन, त्यांनी नांदेडच्या आरोग्य विषयक गरजांविषयी सविस्तर चर्चा केली.
नांदेड जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील लाखो नागरिक आरोग्य सेवेसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहेत. सध्याचा ३०० बेडचा रुग्णालयाचा तांत्रिक व भौतिक विस्तार होऊन तो ५०० बेडपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी डॉ. गोपछडे यांनी केली. नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी होणे आवश्यक आहे. हृदय, मेंदू, मूत्र, यकृत, अस्थी अशा विविध गंभीर आजारांवर नांदेडमध्ये उपचार मिळावे यासाठी सुपर ...
