School : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ?
नांदेड| दर्गा मोहल्ला, अर्धापूर येथील डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर ही शासनमान्य शाळा असून तिची मूळ परवानगी ही दर्गा मोहल्ला येथील पत्त्यावर आहे. मात्र, अर्धापूर एज्यूकेशन सोसायटी या संस्थेचे वादग्रस्त अध्यक्ष सय्यद वसीम बारी सय्यद शमसुद्दीन यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता शाळेचे अनधिकृत स्थलांतर जवळपास दीड किलोमीटर दूर असलेल्या जम जम फंक्शन हॉलच्या मागे असलेल्या मदरसा इमारतीत केल्याचा गंभीर आरोप पालक आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या स्थलांतरास कोणतीही वैधानिक मान्यता नसताना, शाळेचे फलक (बॅनर) मात्र मदरसा इमारतीवर लावण्यात आले असून प्रत्यक्षात शाळा मात्र जुने ठिकाण – दर्गा मोहल्ला येथेच सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाच्या नियमांची पायमल्ली?
शाळेच्या स्थलांतरासाठी शिक्षण विभागाची आगाऊ परवानगी घेणे बंधनकारक असून तसे आदेश शिक्षण अधिकार्यांच्या परिपत्रकांद्व...
