plastic ban | किनवट नगरपरिषदची अतिक्रमण,विना परवानगी बॅनर,प्लास्टिक बंदीची धडक कार्यवाही -NNL
किनवट परमेश्वर पेशवे।किनवट नगर परिषदच्या वतिने काल शहारातील शिवाजी महाराज चौक परीसर,मच्छी मार्केट परीसर,जिजामाता चौक परिसरात अतिक्रमण, विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबिविण्यात आली.
मोहिमेअतर्गंत प्लास्टिक बंदी अनुषंगाने शहारातील दारु भट्टी चालकाकडुन ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक परिसरात वर्षोन वर्षे असलेले अतिक्रमन धारक,व्यापारी,फेरीवाले यांचा नाहक ञास वाहतुकीस, नांगरीकांना होत होता,वारवांर सुचना देऊन सुध्दा अतिक्रमण धारक ऎकत नसल्याले शेवटी धडक मोहीम राबवून अतिक्रमण धारकांचे साहित्य,टेबल,जार, बकीटी,कॅरेट,वजन काटे,विना परवानगी बॅनर, इतर साहित्य जप्तीची कार्यवाही करण्यात आली.
तसेच मोहिमे अतर्गंत 25 कि.लो प्लास्टिक जप्त करण्यात असून, या धडक कार्यवाहीमुळे नगर परिषदेचे मुख्यधिकारी अक्शन मोडवर आले असल्याची चर्चा सामान्य नागरीकांकडुन क...
