Umarkheed ; उमरखेड तालुक्यात तीन महिन्याचे रेशन वितरणामध्ये सावळा गोंधळ….
उमरखेड l शासन निर्णयानुसार पुढील दोन महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास गोर गरीब जनता अन्नधान्यापासून वंचित राहू नये याकरिता सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे माहे जून मध्ये जून जुलै ऑगस्ट अशा तीन महिन्याचे रेशन वाटप करणे सुरू आहे परंतु उमरखेड शहरासह तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या शासनाच्या निर्णयाला पुरवठा विभाग रास्त भाव दुकानदार न जुमानता सावळा गोंधळ करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना मधील मोफत धान्य पुरवठा ही एक महत्वपूर्ण योजना असून उमरखेड शहरासह तालुक्यात याची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. लाभार्थी नागरिकांना रास्त भाव दुकानात रेशन मिळण्यासाठी नाहक त्रास होत आहे.
एरवी एक महिन्याचे धान्य वाटप करण्याकरिता रास्त भाव दुकानदार संपूर्ण महिना घालतात आणि या जून महिन्याम...
