Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
हदगांव| हदगांव तालुक्यातील हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त धम्म कीर्ती महिला मंडळाच्या वतीने मागील दहा दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी माता रमाई यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतांवर महिलांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उत्कृष्ट तालबद्ध सादरीकरणामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, गाणी व नृत्यप्रकार सादर करण्यात आले. लहान बालकांनी केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. “नांदन नांदन होतं रमाचं नांदण” हे गीत वारंवार सादर करण्यात आले, तर “रमाबाई...
