Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना
नांदेड| मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्चला सकाळी 11 वा. आठशे भाविकांना घेऊन रवाना झाली आहे. या रेल्वेला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज रवाना करण्यात आले.
या रेल्वेला राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तर रेल्वे स्थानकावर बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती.
राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जावून, मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे या...
