Awarded : “मराठवाडा आयकॉन्स २०२५” हा प्रतिष्ठीत पुरस्कार साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना
किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाडा विभागातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा "मराठवाडा आयकॉन्स २०२५" हा प्रतिष्ठीत पुरस्कार यंदा आध्यात्मिक गुरु श्री साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना प्रदान करण्यात आला. या गौरवाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने किनवट येथे आयोजित रक्तदान शिबिरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील पंचतारांकित हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे भव्य समारंभात विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, तसेच विभागीय आयुक्त पापळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पुरस्कारासाठी विभागातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची काटेकोर त...
