Nature and Cultivation Cleanliness : स्वभाव व संस्कार स्वच्छता: शाश्वत स्वच्छतेची गुरुकिल्ली -NNL
दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छतेसाठी देशभर स्वच्छता ही सेवा 2024 हा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही यावेळची थीम आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषदेचे मिलिंद व्यवहारे यांचा लेख प्रकाशीत करत आहोत.
नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्वच्छते विषयी विविध योजना व उपक्रम ग्रामीण व नागरी भागात राबवित असते. गेल्या दहा वर्षापासून स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा मोहिम स्वरुपात घेण्यात येतो. यावर्षीही दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2024 हा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या संकल्पना घेऊन राज्यभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंरफुर...
