Nanded Airport transfer process : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे नांदेड विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेस प्रारंभ
नांदेड| नांदेड येथून सध्या अनेक मोठया शहरात विमानसेवा सुरु आहे. नांदेड येथील विमानतळ सध्या एमआयडीसीच्या ताब्यात असुन लवकरच ते महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. यासाठी आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करुन औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे एसआर मॅनेजर रोहित राहपाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत देशपांडे, नियोजन अधिकारी भक्ती चितळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता कल्पेश लहीवाल, मो जावेद व बेग उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती.
विमानतळावरील वि...
