Monday, June 29

Tag: to ensure peaceful celebration

traffic check campaign : हिमायतनगरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून वाहतूक तपासणी मोहीम

traffic check campaign : हिमायतनगरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून वाहतूक तपासणी मोहीम

क्राईम, नांदेड
हिमायतनगर (अनिल मादसवार) येथील पोलिसांकडून दररोज विना परवाना, विना लायसन्स, ट्रिपल सीट, बिना नंबर प्लेट, टुकार तसेच अल्पवयीन मुलांकडून चालविल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवित कडक कारवाई करण्यात येत आहे. गणेशोत्सव कोणतेही गालबोट न लागता, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेत अवघ्या दोन दिवसांत १० ते १५ वाहनांवर कारवाई करून १२ हजार रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला. ही कारवाई ट्रॅफिक मशीनच्या सहाय्याने करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर काही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी आवाहन केले की, नागरिकांनी कोणतेही अनधिकृत वाहन चालवू नये. कायद्याची वचक राहणे आवश्यक असून उत्सव आनंदात व सुरक्षिततेत साजरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य कराव...
error: Content is protected !!