Take Action Against That Engineer ; त्या अभियंत्यावर कारवाई करा; घरकुलासाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईसाठी रुई वासियांचा ग्रामसभेत ठराव
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर। घरकुल लाभार्थ्याकडून मस्टर काढून देण्याच्या नावावर पैसे उकळणाऱ्या अभियंता व रोजगार सेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता रुई गावकऱ्यांनी ग्रामसभेत एकमताने ठराव घेतला आहे.
माहुर तालुक्यातील रूई येथील रोजगार सेवक अशोक मानतुटे हा गावातील घरकुल कामाचे मस्टर काढण्यासाठी पंचायत समितीचे घरकुल विभागाचे अभियंता श्रीराम यांना पैसे द्यावे लागतात त्याकरिता लाभर्थ्यांकडून पैशाची मागणी करीत असुन जे लाभार्थी पैसे देतील त्याचेच मस्टर काढण्यात येईल अशी तंबी घरकुल लाभार्थ्यांना देत असल्याने गरीब लाभार्थी आपले घरकुलाचे पैसे मिळावे याकरिता गपगुमान पैसे देत होते परंतु पैशाची वारंवार मागणी केल्या जात असल्याने याची तक्रार गावकऱ्यांनी सरपंच,सचिवांकडे करून कारवाईची मागणी केली.
याची शहानिशा केल्या नंतर हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सरपंच ,सचिव व ग्राम ...
