Thirst will be quenched : टंचाईग्रस्त देगलूर, मुखेड तालुक्याची तहान भागणार
नांदेड| लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणी वापर क्षमता 5.23 टीएमसी इतका असून प्रकल्पामुळे 26 हजार 924 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
काल 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या उपस्थितीत लेंडी प्रकल्पाच्या घळभरणीबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच कामाच्या नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव कुटूंब पुर्नवसन अनुदान वाटप करणे, शेतकऱ्यासाठी सानुग्रह अनुदान वाटप करणे व पहिल्या टप्प्यातील 7 गावातील भुखंड वाटप करणे इत्यादी गोष्टीचा परामर्श घेण्यात आला.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी पुर्नवसन मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता देगलूर दाभाडे, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अ...
