Rahul Shankarao ; अल्प भूधारक शेतकऱ्याचा मूलगा झाला प्रथम श्रेणी अधिकारी’ : राहुल शंकरराव महामुने यांचे एमपीएससीत यश – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l पाणी टंचाईग्रस्त पाचोंदा गावातील अल्प भूधारक शेतकऱ्याचा मुलगा राहुल शंकरराव महामुने यांनी मोठ्या परिश्रम व जिद्दीने अभ्यास करून एमपीएससी परिक्षेत उज्ज्वल यश मिळवून " 'प्रथम श्रेणीअधिकारी 'अ' पदाला गवसनी घातल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. अतिदूर्गम पाचोंदा येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य रमाबाई व शंकरराव महामुने यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचं बाळकडू पाजलं. शिक्षणावर भर देवून त्यांनी तिन्ही मुलं शिक्षक केली.
त्यांचा मोठा मूलगा अनिल महामुने हे शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा प्रवास करत, माजी गट शिक्षणाधिकारी व पीएम पोषण आहार शक्ती निर्माण योजना अधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मुलगाही शिक्षक आहे. राहूल महामुने हा त्यांचा धाकटा मुलगा. राहूलचे प्राथमिक शिक्षण पाचोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर गोकुंदा येथील महात्मा ज्य...
