The pain of the farmers: होत्याचं नव्हतं झालं हो…..अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वेदना -NNL
अर्धापूर| जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्यात 31 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर मागील 72 तासापासून कायम असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना महापूर आला आहे. गावाला शहराशी जोडणारे प्रमुख रस्त्यावरचे नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील शेलगाव बुद्रुक, शेलगाव खुर्द, सांगवी, भोगाव, देळुब खुर्द, या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता. आजही शेलगाव या गावचा संपर्क तुटलेलाच आहे. अनेक गावातील शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते तर नदीकाठचे शेतीतले पिके कापूस, सोयाबीन, मूग, हळद, ऊस, केळी व पालेभाज्या हे पिके खरडून गेली. मागील 72 तासापासून पिकात पाणी असल्यामुळे पिके सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांचा निर्माण झाली.
यावर्षी सोयाबीन व इतर पिकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येत होती परंतु या तीन दिवसाच्या पावसाने होते त्याचे नव्हते केले म्हणून या भागातील शेतीच्या ...
