Samarasata Sahitya Sammelan ; समरसता साहित्य संमेलनाच्या साहित्य दिंडीने नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले
नांदेड l विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा प्रारंभ शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नांदेड शहरातून काढण्यात आलेल्या भव्य साहित्य दिंडीने करण्यात आला. नांदेड शहरातील विविध शाळा, विशेषतः नाना पालकर प्राथमिक विद्यालय, राणी लक्ष्मीबाई हायस्कूल व ज्ञानभारती विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक यामध्ये सहभागी झाले होते. विविध शाळांच्या मुलांनी समाज सुधारकांचे विविध देखावे सादर केले होते.
तसेच वारकऱ्यांच्या वेषामधील विद्यार्थ्यांचे पथक ज्ञानोबा तुकाराम यांच्या अभंगाचा व समाजसुधारकांच्या वचनांचा जयघोष करत होते.ग्रंथदिंडी मधील चित्ररथामध्ये भारतमाता व संविधान ग्रंथ ठेवण्यात आला होता.
तसेच ग्रंथाच्या पालखीमध्ये विविध समाजसुधारकांनी लिहिलेले ग्रंथ ठेवण्यात आले होते.जातिवंत लोककलावंत, भटक्या विमुक्त जमातीतील समाज बांधव, वासुदेव, गोंधळी, जोशी, मशान जोगी, मसनजोगी ,नाथ जोगी,बहुरूपी मदारी य...
