Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचा आज वाढदिवस. या निमित्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी लिहिलेला लेख येथे देत आहोत.
एखाद्या नेत्याकडे समर्पित भावनेने काम करणारी कार्यकर्त्यांची टीम असणे अत्यंत आवश्यक आहे. जर ही टीम नेहमीच ‘ॲक्टीव्ह मोड’ वर असेल तर त्या नेत्याची राजकीय उंची अधिक वाढते. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची उर्जा निर्माण करतांनाच त्यांचे सुख, दुःख नेत्यांपर्यंत पोंहचवून त्यांच्याकडून कार्यकर्त्यांसाठी मदतीचा हात देणारा एखादा दुवा आवश्यक असतो.
उपरोक्त वर्णन केलेल्या या सर्व बाबींमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण व कार्यकर्त्यांमध्ये दुवा म्हणून काम करण्याची महत्वपूर्ण भूमिका अमरनाथ राजूरकर नेहमीच वटव...
