Nanded ; सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते संपन्न
नांदेड l सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
हे प्रशिक्षण न्यूट्रिशन, स्तनपान, पूरक आहार या विषयावर होत असून चार दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण सहा बॅचेस निवड केलेली असून जवळपास 300 अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाचा लाभ घेत आहे. प्रशिक्षण दि. 03-04-2025 ते 15 -04 -2025 तारखे पर्यंत असणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवा बळकटीकरणांमध्ये माता व बाल आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. माता व बालकाचे आरोग्...
