However, the district administration : पेसा कायद्याची जनजागृती करणाऱ्या जिल्हा प्रशासनास अंमलबजावणी करण्याचा मात्र विसर -NNL
नांदेडमाहूर,किनवट| पेसा कायद्याची जनजागृती करण्याचे कार्यक्रम जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी किनवट, गट विकास अधिकारी पं.स.माहूर यांच्या आदेशानुसार माहूर तालुक्यात घेण्यात येत आहेत.
ही बाब चांगली असली तरी पेसा क्षेत्र असलेल्या मौजे वझरा शेख फरीद ता.माहूर ग्रामपंचायतीने दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी ग्रामसभेत पारित केलेल्या ठरवाची अंमलबजावणी होतांना दिसत नाही किंबहुना त्या ठरावाची अंमलबजावणी करावी म्हणून मागील दीड वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सीटू कामगार संघटनेचे बेमुद्दत साखळी उपोषण अद्यापही सुरु आहे. कारवाई न होणे ही बाब खुपच दुर्दैवी आहे.
त्याचे असे की, वझरा ह्या आदिवासी,डोंगराळ, नक्षलप्रवण क्षेत्रात असलेल्या गावात मागील पन्नास वर्षात नवीन प्लॉट्स पडले नाहीत. त्याचे कारण म्हणजे वझरा गावाशेजारी असलेली जमीन ही जंगल...
