Sub-Divisional Officer Dr. Khallal ; वेळोवेळी पोलीस पाटील यांच्ये सहकार्य आवश्यक उपविभागीय अधिकारी डॉ.खल्लाळ
नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील तुप्पा मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महास्वराजय अभियान मध्ये स्वताहून केलेले कार्य हे अभिनंदनीय असुन आपत्ती काळात ही पोलीस पाटील यांच्ये सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी सत्कार प्रसंगी केले यावेळी पोलीस पाटील यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला बदल अभिनंदन केले.
नांदेड तालुक्यातील तुप्पा मंडळ अंतर्गत असलेल्या आठ गावातील पोलीस पाटील यांच्या वतीने गोपाळचवाडी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महास्वराजय अभियान अंतर्गत विविध योजना शिबीर प्रसंगी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ,नांदेड तहसीलदार संजय वारकड, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रवींद्र राठोड, मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगावकर, ग्राम महसूल अधिकारी कविता इंगळे, यांच्या सह गोपाळ चावडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी ...
