The amount to be deposited by the crop insurance company : 20 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा कंपनीकडून जमा होणार रक्कम -NNL
नांदेड| प्रधानमंत्री पिक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम 20 ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे. आतापर्यंत 119 कोटी जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी 20 ऑगस्टनंतर तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना हा लाभ दिला जात आहे .त्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये थेट नुकसान भरपाई वितरित केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार विमा कंपन्यांनी कारवाई सुरू केली आहे. 2लक्ष 54 हजार 333 शेतकरी नु...
