Saturday, May 30

Tag: Tehsildar Mrs. Pallavi Temkar visited

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाशिवरात्री निमित्त मागील आठ दिवसापासून आयोजित अखंड हरिणाम सप्ताह शेवटच्या दिवशी दहीहंडी व काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात, मंदिर ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्षा सौ. पल्लवी टेमकर यांनी भेट देऊन श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तसेच मंदिराच्या नूतन कार्यालयाची पाहणी करून कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. श्री परमेश्वराच्या छायाचित्र प्रतिमेबाबत सूचना देताना त्यांनी तिरुपती बालाजीप्रमाणे आकर्षक थ्री-डी स्वरूपातील छायाचित्रे विक्रीसाठी उपलब्ध करावीत, जेणेकरून श्री परमेश्वराची महिमा अधिक दूरवर पोहोचेल, असा सकारात्मक पुढाकार समितीने घ्यावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता द...
error: Content is protected !!