बळीराम पाटील महाविद्यालयात करिअर संसद पदाधिकाऱ्यांची शपथविधी सोहळा संपन्न -NNL
किनवट,परमेश्वर पेशवे। बळीराम पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय किनवट येथे करिअर कट्टा विभागाच्या वतीने करिअर संसद पदाधिकारी शपथविधी सोहळा दिनांक 15 जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य एस.के.बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यवाहक प्रा. अनिल पाटील सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्तावना करिअर कट्टा महाविद्यालय समन्वयक डॉ.आनंद भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक प्रा संतोष गोपीचंद पवार यांनी केले.
याप्रसंगी करिअर संसदेतील मुख्यमंत्री म्हणून अनुसया लक्ष्मण पवार, नियोजन मंत्री म्हणून वेदिका अजय जयस्वाल, कायदे व शिस्तपालन मंत्री कृतिका गजानन बारापात्रे, सामान्य प्रशासनम...
