स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला जिल्ह्यात सुरुवात – NNL
नांदेड| आपल्या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्हयात आज सोमवार दिनांक ८ जुलै पासून स्वच्छतेचे दोन रंग अभियाला सुरुवात झाली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत राज्य माहे डिसेंबर पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात ५ संवादकाची निवड करण्यात आली असून हे संवादक प्रत्येकाच्या घरी जावून संदेश देत आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, बचत गटातील महिला व गाव स्तरावरील स्वंयसेवक गृहभेटी करून स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत.
मुख्य कार्यकारी अ...
