Nanded News : नांदेड–मुंबई व नांदेड–गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून खा. अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
नांदेड| माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, नांदेड - मुंबई आणि नांदेड - गोवा या बहुप्रतिक्षित विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नांदेड - मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबई विमानतळाऐवजी मुंबईतील मुख्य विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली होती. ती मागणी देखील मंजूर झाली आहे, हे उल्लेखनीय!
खा. अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही विमानसेवांचे संचालन स्टार एअर ही कंपनी करणार असून, या सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतील. मुंबई - नांदेड विमान दररोज दुपारी ४.४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५.५५ वाजता नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल. त्याच विमा...
