नांदेडसोशल वर्क

Survey of Saathi Mohim Destitute Children : साथी मोहिम निराधार मुलांचे सर्वेक्षण

नांदेड| राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 26 मे ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान दुर्लक्षित निराधार, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांचा आधार नोंदणीद्वारे स्वतःचे ओळख प्रदान करण्याची मोहिम नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सुरू झाली आहे.

त्या अनुषंगाने विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मुलांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाह, समितीच्या समावेश कायदेविषयक सर्वेक्षण इत्यादी बाबी त्यांना उपलब्ध करून देण्याची मोहिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे.

या मोहिमेत पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकरी, शिक्षण अधिकारी, सामाजिक संस्था, बालकल्याण समिती व विधी स्वयंसंस्था यांचा समावेश आहे. अशा मुलांची माहिती असल्यास संबंधितांनी सदरची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांचे कार्यालयात द्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button