socially conscious donation : विवाहातून कृतज्ञतेकडे : ‘सुमन-संगम’ यांची समाजनिष्ठ देणगी
नांदेड| सामाजिक जाणिवेतून आणि परिवर्तनाच्या ध्येयातून एकत्र आलेल्या संगमेश्वर लांडगे आणि सुमन यांच्या विवाह सोहळ्याने केवळ दोन जीवांचे नव्हे, तर दोन विचारशील प्रवाहांचेही सुंदर संमेलन घडवले. मराठा सेवा संघाच्या विविध चळवळींमध्ये कार्यरत असलेले संगमेश्वर लांडगे हे ‘वीर भगतसिंग परिषद’ चे जिल्हाध्यक्ष ते देशाचे प्रसिद्ध प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत, गेली अनेक वर्षे सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातूनही त्यांनी माध्यम क्षेत्रात अमीट ठसा उठवत, अनेक दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत, प्रज्ञा-प्रतिभावंतांना मंच मिळवून दिला. त्यांच्या समविचारी सहचारिणी सुमन ह्याही सामाजिक कार्यात सक्रिय असून दोघेही वैचारिक आणि परिवर्तनवादी चळवळीत महत्वाचे योगदान देत आहेत.
या वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा नांदेड ...
