Friday, May 15

Tag: Six ministers discuss

Revenue Minister Bawankule : दिव्यांगांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची चर्चा; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा

Revenue Minister Bawankule : दिव्यांगांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची चर्चा; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा

कृषी, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, मुंबई, हिंगोली
मुंबई| राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, ग्रामपंचायत कर्मचारी व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक तोडगा अखेर आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तातडीच्या मध्यस्थीमुळे निघाला. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात आयोजित विविध विभागांच्या मंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या बैठकीस कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पणन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विभागांमधील समन्वय घडवून आणत काही प्रश्नांवर थे...
error: Content is protected !!