Sunday, May 31

Tag: Shyam has gone crazy

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

नांदेड, मनोरंजन
नांदेड l उद्घाटन समारंभा नंतर झालेली रुचिरा केदार यांची मैफल श्रोत्यांना उल्हसित करून गेली. शास्त्रीय आणि भावसंगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका रुचिरा केदार यांनी आधुनिक व पारंपरिक गाणशैलीचा सुंदर मिलाफ करीत साकारलेला "श्यामकल्याण" नांदेडकर रसिकांना अभिमंत्रित करून गेला. अतिशय नजाकतदार मध्य,तार सप्तकात लिलया फिरणारा आवाज, प्रस्तुतीकरणातील सहजत ही त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होतं. तालांगाशी खेळत त्यांनी रागाची केलेली मांडणी सहजसुंदर वाटली. पं. गिरीजादेवीच्या "क्या जादु डाला सावरिया" या सादर करण्यात आलेल्या ठुमरीने त्यांच्या मैफलीची रंजकता वाढविली. त्यांना तबला संगत रोहित मुजुमदार यांची हार्मोनियम संगतअदिती गद्रे तर तानपुरा साथ माधवी मठपती नेहा थोरात यांची होती.प्रारंभी आ. श्रीजया चव्हाण,सत्कार अपस्तंभ यांनी कलावंताचे आतिथ्य केले तर सुत्रसंचालन प्रा.डाॅ.विश्वाधार देशमुख यांनी केले....
error: Content is protected !!