Shivswarajya Din ; श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा
नांदेड l श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत दिनांक ६ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिनानिमित्त संस्थेत राष्ट्रप्रेमाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या हस्ते स्वराज्याचे प्रतीक असलेल्या स्वराज्यगुढी उभारणीने झाली. यावेळी १५ फूट उंचीची स्वराज्यगुढी अष्टगंध, अक्षता, पुष्पहार व आंब्याच्या पानांनी आकर्षकपणे सजवण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी “राष्ट्रगीत” आणि “महाराष्ट्र गीत” सामूहिकरित्या गायले.
या प्रसंग...
