शिवराज्याभिषेकाने सांस्कृतिक उत्क्रांती झाली – ‘शिवजागर’ उपक्रमात चेतन कोळी यांच मत – NNL
नांदेड| “शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील राज्याभिषेकाची घटना ही इतिहासाचा प्रवाह बदलण्यास कारणीभूत ठरली. महाराजांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्षे मुघलांच्या सत्तेला भिडण्याचे आणि दिल्लीचे तख्त राखण्याचे असामान्य शौर्य व धैर्य मराठे दाखवू शकले याची प्रेरणाबीजे राज्याभिषेकाच्या घटनेत आहेत. राज्याभिषेकाने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक क्षेत्रांतही उत्क्रांती घडली. शिवराय हे केवळ राष्ट्रपुरुष नव्हते तर ते जागतिक स्तरावरील युगपुरुष होते” असे मत चेतन कोळी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेड , कृष्णा पब्लिकेशन्स आणि सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “शिवजागर” या उपक्रमात ते नांदेड येथे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अविनाश कदम विभाग प्रमुख भुशास्त्र विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदय...
